
वाळूजमहानगर, (ता.6) – भरधाव जाणाऱ्या ट्रक्टरवरून खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन एका 24 वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा शुक्रवारी (ता.5) रोजी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास एस क्लब चौकात झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साऊथ सिटीकडून ए एस क्लबकडे ट्रॅक्टर येत होता. या ट्रॅक्टर मधील चालकाच्या बाजूला विवेककुमार यादव वय 24 वर्ष हा बसलेला होता. ट्रॅक्टर भरधाव असल्याने ए एस क्लबच्या पुलाखालून वळून घेत असताना विवेक हा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यास वैभव सुर्यवंशी यांनी उचारार्थ घाटीत दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी (ता.5) दुपारी 2.15 वाजेचया सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोह मंगेश मनोरे करीत आहे.
