
वाळूजमहानगर – भरधाव जाणाऱ्या एका ट्रक चालकाने दारूच्या निषेध निष्काळजी व हायगाईने ट्रक चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात 56 वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास वाळूज येथे झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रद्धा कॉलनी, वाळूज येथील पुंडलिक दगडु अहिरे (वय 56 वर्ष) हे ओएसिस चौक, येथील सारस्वत बॅकेत सिक्युरिटी गार्ड म्हणुन नोकरी करत होते. सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी अहिरे हे प्लॅटिना दुचाकी (एमएच 20, एचजी -4844) वरून डुयटीला जात असताना कापसाची वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीचा ट्रक (एम एच 10, झेड -1175) चा चालक नितीन दशरथ डरफे (वय 36 वर्ष) रा. इरगाव ता. गेवराई जि.बीड याने त्याच्या ताब्यातील ट्रक दारूच्या नसेत निष्काळजी व हायगाईपणाने चालवून पुंडलिक अहिरे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. वाळूज येथील देशी फाट्यावर रात्री 10:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने कुंडलिक अहिरे हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी अपघात ग्रस्त दुचाकी व कापसाने भरलेला ट्रक ताब्यात घेऊन अहिरे यांचा मृतदेह घाटीत रवाना केला. याप्रकरणी शुभम पुंडलिक अहिरे (वय 25 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात चालक नितीन दशरथ डरफे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
