वाळूजमहानगर, ता.4 – कंपनीत कामासाठी जाणाऱ्या 25 वर्षीय कामगाराच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. हा अपघात 1 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वसीम सय्यद अन्सारी (वय 25) रा. दत्तनगर, रांजणगाव (शेणपुंजी) हा 1 फेब्रुवारी रोजी दुचाकी (एमएच 20, एच सी- 7019) वरून रात्रपाळीसाठी कंपनीत जात होता. त्याचवेळी गुडइयर कंपनीकडुन भरधाव येणाऱ्या ट्रक (ओ डी 15, झेड ओ -021) च्या चालकाने वाशिम याच्या तुमचा केला जोराची धडक दिली. वाळूज औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर फाट्यावर रात्री 11 वाजेच्या सुमारास आलेल्या या अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. जखमी वसीम अन्सारीवर घाटीत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी फिरोज अन्सारी यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.