March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.1) – टेंभापुरी शिवारात एका 30 वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.1) रोजी दुपारी उघडकीस आली.

याबाबत पोलीसांनी सांगितले की, टेंभापुरी शिवारातील सुरेश साईनाथ ढोले यांच्या शेताच्या बाजुला लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने सोमनाथ राजाराम ढोले याने गळफास घेतला. त्यास नवनाथ ढोले, चांगदेव ढोले यांनी बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यास डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. या प्रकरणी घाटीतुन आलेल्या माहीतीवरुन वाळुज पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *