
वाळूजमहानगर, (ता.12) – श्री गजानन ज्युनिअर कॉलेज (सायन्स, कॉमर्स, आर्ट्स) रांजणगाव (शे.पु) यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी च्या विद्यार्थ्यां करिता व अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शंभर गुणांच्या टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन रविवारी (ता.12) रोजी करण्यात आले होते.

या परीक्षेसाठी रांजणगाव (शेणपुंजी), बजाजनगर व वाळूज महानगर परिसरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परीक्षेत प्रथम श्रेणीतील पाच विद्यार्थ्यांना 50 टक्के शैक्षणिक स्कॉलरशिप, द्वितीय श्रेणीतील 10 विद्यार्थ्यांना 25 टक्के शैक्षणिक स्कॉलरशिप आणि तृतीय श्रेणीतील 10 विद्यार्थ्यांना 10 टक्के शैक्षणिक स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या परीक्षेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव यांनी केले होते. या परीक्षेसाठी कॉलेजचे प्राचार्य महेश शिनगारे तसेच पूजा गिरी, नरवडे प्रीती, डी.जे. कोळी, सौरभ लगड, हनुमान जाधव, विनय अवसरमोल यांनी विशेष परिश्रम घेतले.
