March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची व भरधाव येऊन अचानक वळण घेत असलेल्या कंटेनरची धडक होऊन एक जण जखमी झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील ईसारवाडी फाट्यावर शुक्रवारी (ता.3) रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास झाला. अपघात ग्रस्त इसमाला श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अंबुलन्स मधून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल करण्यात आले.

 

अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, खानदेश जळगाव येथून पीव्हीसी पाईप घेऊन पांढऱ्या रंगाची हरीश रोडलाईन्सची टाटा आयशर (एमएच 14 डी एम -0733) छत्रपती संभाजीनगर मार्गे बारामतीला जात होती. ती ईसारवाडी फाट्याजवळ येत असताना समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने इंडिकेटर न देता डायरेक्ट राइट साईडला वळण घेतले. त्यामुळे कंटेनर व टाटा आयशर यांच्यात धडक होऊन टाटा आयशर (एमएच 14 डी एम -0733) ची ड्रायव्हर साईट पूर्ण दबल्या गेली. या अपघातात चालक महादेव खराडे, वय 23, रा. बारामती हा जखमी झाला. या भातानंतर कंटेनर चालक जखमेला उपचारार्थ दाखल न करता किंवा घटनेची माहिती पोलिसांना न देता कंटेनर्स प्रसार झाला. या अपघाता प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल प्रल्हाद गुहाडे यांनी कळविल्याने श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अंबुलन्स पायलट संदीप त्रिंबके यांनी त्वरित अपघातस्थळी धाव घेत अपघात ग्रस्त इसमाला उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *