
वाळूजमहानगर, (ता.17 – अंदाजे 55 ते 60 वर्षीय अज्ञात इसमाने भोकरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बजाज गेट ते वाल्मी रोडवरील वळदगाव शिवारात घडलेली ही घटना शनिवारी (ता.17) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
वाळूज परिसरातील नगर रोड ते पैठण रोडला जोडणाऱ्या बजाज गेट ते वाल्मी दरम्यानच्या रोडवर वळदगाव शिवारातील एका भोकरीच्या झाडावर चढून एका 55 ते 60 वर्षीय अज्ञात इसमाने शाली सारख्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.17) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाटोदा येथील पोलीस पाटील लहू मुचक यांनी खबर देताच सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट, पोलीस अंमलदार जगन्नाथ गोर्डे व कपिल खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेत मयतास उपचारार्थ घाटीत दाखल केले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रभान गवांदे करीत आहे. पिवळा टी-शर्ट, फिकट निळी पॅन्ट या इसमाच्या अंगात असून टी-शर्टवर बिर्ला ए वन असे लिहिलेले आहे. हा इसम बहुधा हमाल किंवा बिगारी काम करणारा असावा. याबाबत कोणास काहीही माहिती असल्यास तात्काळ सातारा पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट व पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रभान गवांदे यांनी केले आहे.
