February 5, 2026

वाळूज महानगर – भाडेकरू म्हणून आलेल्यानी घर मालकाच्याच घरी चोरी करून रोख रकमेसह 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बंटी बबलीला वाळूज पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील चोरीचा मूल्यमात जप्त केला. ही कारवाई 11 डिसेंबर रोजी करण्यात आली.

vv याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज येथील गणेश वडगावकर यांच्या घरात ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 मध्ये नवनीत मधुकर नाईक वय 45 वर्ष व स्मिता नवनीत नाईक वय 41 वर्ष रा. भांडुप पश्चिम हे भाडेकरू म्हणून राहत होते. दरम्यानच्या काळात या बंटी बबलीने वडगावकर यांच्या घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असे एकूण 65 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.या चोरीबाबत वाळूज पोलीस ठाण्यात बी.एन.एस 303(2),3(5) अन्वये गुन्हा दाखल दाखल होता.


या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे हे करीत असताना वडगावकर यांच्या घरी झालेल्या पोरीच्या पद्धतीने गुन्हे करणारे हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत. त्याबाबत विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती काढली. आणि त्यानुसार अशाच प्रकारच्या चोरीतील आरोपींना उरण पोलिसांनी अटक केल्याची माहिती शितोळे यांना मिळाली. त्यामुळे वाळूज पोलिसांनी आरोपी बंटी बबलीला तळोजा व कल्याण कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर वाळूज पोलिसांनी त्यांना गुन्ह्यात अटक करून पॉलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल करून गुन्ह्यातील चोरी केलेले 3 ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी, चांदीचे तोडे, चांदीचे वाळे व चांदीचे चेन असा एकूण 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

        यांनी केली कामगिरी  – 
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, संदीप वाघ, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *