वाळूजमहानगर – ज्या कंपनीत काम करत होता, त्याच कंपनीत राहणाऱ्या एका 24 वर्षीय कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.15) रोजी सकाळी आठ पंचेचाळीस वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पळसी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील गणेश रामदास बडक वय 24 हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) गट नं. 142 प्लाट नं. 6, मधील आर. डी. कंम्पनी येथे काम करून तेथेच राहत होता. त्याने शनिवारी (ता.15) रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास कंपनीतील पत्र्याचे शेड मधील आडव्या लोखंडी अँगलला मफलरच्या साहय्याने गळफास घेवुन बेशुध्द झाल्याने त्यास लक्ष्मण बडक व दिपक राकडे यांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरने 11.45 वाजता तपासुन मयत घोषीत केले. याप्रकरणी गाठीतून आलेल्या माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.