March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.15) – गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही, तर ते ज्ञान, मार्गदर्शन आणि योग्य मार्ग दाखवणारे असतात. ज्ञानाचे भांडार म्हणजेच गुरु. असा उपदेश विजय महाराज खेडकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचना दरम्यान शिष्यांना दिला.

लिंबेजळगाव येथील सप्तश्रृंगी माता मंदिरात गुरुवारी (दि.10) रोजी सप्तशृंगी माता मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात खेडकर महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी त्यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले व्यवहार, संसारात, कसे वागायचे हे जरी लोकाकडुन शिकायल मिळत असले तरी त्यांच्याशी कसे वागायचे हे ज्ञान गुरु देत असतो.


प्रथम वाळुज येथील गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील बोरकर यांच्या वतीने सकाळी देवीच्या मूर्तीला सपत्नीक अभिषेक व आरती करण्यात आली. वेदशास्त्रसंपन्न दीपक जोशी यांच्या पौराहीत्याखाली करण्यात आली. त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा यावेळेत सप्तशृंगी माता मंदिराचे ह.भ.प. विजय महाराज खेडकर यांचे प्रवचन झाले. प्रवचनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. लिंबेजळगाव, अब्दलपुर, रामनगर, टेंभापुरी, गुरुधानोरा, तुर्काबादच्या हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्ताने कार्यक्रम झाले. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *