वाळूजमहानगर, (ता.13) – तनवानी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ज्ञानभवन इंग्लिश स्कूल बजाजनगर, येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आरोग्य विषयक चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. श्रद्धा परीटकर, डॉ. निशा तौर व डॉ. वैशाली तोतला यांनी महिलांना शारीरिक, मानसिक, आरोग्य विषयक विशेष मार्गदर्शन केले. त्याच बरोबर विद्यार्थिनीच्या आहाराविषयी देखील सविस्तर चर्चा केली. या चर्चेत महिलांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तंज्ञ डॉक्टरांनी दिले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. वर्ग 5 वीच्या विद्यार्थीनीनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून नृत्य सादर केले. हनुमान भोंडवे यांनी पालकांना राजमाता जिजाऊ यांचा छत्रपती शिवाजी महाराजाना घडविण्यात मोलाचा वाटा होता. त्यामुळे तुम्ही देखील सर्व जिजाऊ आहात. तुमच्या हातून देखील या राष्ट्राचे नवे शिवबा घडू शकतात. असे सबोधित केले.या प्रसंगी विभाग प्रमुख वैभव पवार शाळेच्या मुख्यध्यापिका बडे मॅडम व शिक्षक उपस्थित होते.
