April 13, 2026


वाळूज महानगर (ता.13) – वडगाव गट नंबर परिसरातील ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी 13 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास शाळेचे संचालक उमेश दुधाट पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांचे महान कार्य, त्याग आणि समाजासाठी केलेले अमूल्य योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची माहिती देऊन समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनीही महामानवाच्या कार्याबद्दल आपल्या शब्दांत मनोगत व्यक्त केले, ज्यातून त्यांच्या विचारांची जाण आणि प्रेरणा स्पष्ट दिसून आली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचारांची रुजवात होत असल्याचे जाणवले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या ॲडमिन सौ. गीतांजली राऊत तसेच शिक्षिका सौ. शीतल शेंडे, रेखा अंकामवर, सौ. शीतल तुपे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमातून जातीपातीच्या भिंती ओलांडून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचा संदेश देण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *