
वाळुज महानगर, (ता.2) – जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश ठोकळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल घरमोडे, सरपंच योगिता आरगडे, उपसरपंच नजीरखा पठाण, माजी सरपंच प्रवीण दुबिले, योगेश दळवी, युवासेना तालुका अधिकारी रमेश आरगडे, सूर्यभान काजळे, उद्योजक अमोल लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य भारती गणेश साबळे, मीना पंडित पन्हाड, प्रभाकर काजळे, कृष्णा काजळे, गजानन बोंबले, शेख मुव्हीज, विलास सौदागर, सुरेश वाघमारे, मनसाराम दिलवाल, अनिल वाघ, अरुण पठारे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
