February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.2 (बातमीदार) – जेवण झाल्यानंतर नेहमी प्रमाणे शतपावली करत असलेल्या एका 27 वर्षीय विवाहितेचा गावातीलच एका तरुणाने तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (ता.1) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास जोगेश्वरी येथे घडली.

जोगेश्वरी येथील आंबेडकर नगर येथे 27 वर्षीय विवाहिता माहेरी राहते. पिडीत महिला शनिवारी (ता.1) जानेवारी रोजी जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास शतपावली करत होती. ती मेन रोड वरून जात असताना त्याच परिसरात राहणारा आरोपी विशाल पवार याने आवाज देऊन तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेली महिला घरी गेली आणि तिने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *