March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.22) – घरातील सर्व कुटुंब झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा व घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरचे लॉक तोडुन 1 लाख 95 हजार 10 रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागीने चोरून नेले. जोगेश्वरी गट न. 60 येथील रो हाऊस नं.7 झालेली ही चोरीची घटना शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश धोंडीराम हुले (वय 33 वर्ष) हे वाळूज परिसरातील रोहाऊस नं. 7 सुशिलभवन गट नं. 60 वाळुज कमळापुर रोड जोगेश्वरी येथे पत्नी, आईवडील, भाऊ, भावजई असे मुलांसह एकत्र राहतात. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हुले कुटुंब त्यांच्या रो हाऊसला कुलूप लावून शेजारच्या रो हाऊस मध्ये झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रो हाऊसच्या घराचा दरवाजा व आतील लाकडी कपाटाचे लॉकरचे कुलूप तोडून विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागदागिने मिळून 1 लाख 95 हजार 210 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

चोरी गेलेल्या सोन्या चांदीच्या दाग दागिन्यांमध्ये 57 हजार 200 रुपये किंमतीचे 4.470 मिली ग्राम वजनाचे सोन्याचे एअर रिंग, 20 हजार 500 रुपये किंमतीचे 2.930 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, 17 हजार 130 रुपये कींमतीचे 2.500 ग्राम वजनाचे सोन्याचे 45 मणी, 24 हजार 80 रुपये किंमतीचे 3.440 ग्राम वजनाचे सोन्याचे वेल, 6 हजार 80 रुपये किंमतीचे 1.280 ग्राम वजनाचे सोन्याचा ओम, 2 हजार 300 रुपये किंमतीचे 36.150 ग्राम वजनाचे चांदिचे घुगरु वाळे, 9 हजार 370 रुपये किंमतीचे 1.890 ग्राम वजनाचे सोन्याची बुगडी, 300 रुपये किंमतीचे 60 मिली सोन्याचे मणी, 2 हजार 550 रुपये किंमतीचे 15 ग्राम वजनाचे चांदीचे जोडवे, 45 हजार रुपये किंमतीचे 10 ग्राम वजनाची सोन्याची पोत, 2 हजार 200 रुपये किंमतीचे 0.420 ग्राम वजनाचे सोन्याचे ओम, 2 हजार 600 रुपये किंमतीचे 540 मिली ग्राम वजनाचे सोन्याच्या धातुचे गोल मणी, 300 रुपये किंमतीचे 1 ग्राम वजनाचा सोन्याचा पुतळा, 4 हजार 350 रुपये किंमतीचे 1.500 मिली ग्राम वजनाचे सोन्याचे मणी, 1 हजार 250 रुपये किंमतीचे 400 मिली ग्राम वजनाचे सोन्याची अंगठी. याचा समावेश आहे.

शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गणेशची भावजई रोहिनी नारायण हुले ही झोपीतून स्वतःच्या रो हाऊस मध्ये आली असता ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

———————-

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *