
वाळुज महानगर, (वार्ताहर) – जोगेश्वरी येथील आंबेडकरनगरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचे कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. हा प्रकार सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह आंबेडकरनगर जोगेश्वरी येथे राहते. सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी सर्वजण घरीच असताना दुपारी 4 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तीन मिळून आली नाही. त्यामुळे तिचे कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची शंका वर्तवत तिच्या आईने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. वय 17 वर्ष 5 महिने, रंग सावळा, उंची अंदाजे 5 फूट, सळपातर बांधा, अंगात पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस, मराठी, हिंदी भाषा बोलते. असे तिचे वर्णन आहे.
