
वाळूज महानगर, (ता.13) – जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारीपदी स्वप्नील घरमोडे यांची नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांचा जोगेश्वरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गुरुवारी (ता.13) रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच योगिता आरगडे, रमेश आरगडे, उपसरपंच नजीरखा पठाण, उद्योजक अमो लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य योगेश दळवी, मन्साराम बिलवाल,
शेख मोईस, सूर्यभान काजळे, पंडित पन्हाड, सुरेश वाघमारे, कृष्णा काजळे, अनिल वाघ, प्रवीण थोरात, प्रवीण दुबिले, गणेश साबळे, गणेश ठोकळ, विलास सौदागर, गजानन बोंबले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
