
वाळुज महानगर (ता.9) :- सिडको वाळूज महानगर येथील जैन टोडलर्स या स्कुलचे स्नेहसंम्मेलन मोठ्या उत्साहात पार पाडले. या उत्साहवर्धक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एस्ट्रोलोजर सेलिब्रिटी आचार्य सुनील कुमार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आणि डॉ. कविता लाड तसेच शाळेचे अध्यक्ष के. जी. एस. भाटी हे होते.

या स्नेहसंम्मेलनाचा विषय अतुल्य भारत होता. क्रार्यक्रमाची सुरुवात गणश वंदनेने झाली. या स्नेहसंमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यभिषेक, आपल्या दैनंदीन जीवनात सफाई कर्मचाऱ्याचे महत्त्व, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न, पाण्याचे महत्व, विविधतेतुन एकतेचे महत्व सांगणारी नाटीका, नारी शक्तीचे प्रदर्शन, विठ्ठल दर्शनाची ओढ, पंढरपुरची वारी, मोबाइलचे छोट्या मुलांवर होणार परीनाम, भारताने जिंकलेला पहीला क्रिकेट विश्व कप, आजी- आजोबांचे कुटूंबामध्ये महत्त्व, कोरोना व्हायरसशी लढतांना आमचे डॉक्टर आणि त्यांचा आत्मविश्वास, आणि अखंड भारताची रक्षा करणारे आमचे सैनिक व त्यांचे बलिदान. या विषयातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत
पालक तसेच विद्यार्थ्यांना प्रेरना देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशुधा मॅडम, हर्षिता मॅडम आणि तवार सर यांनी केले. तर आभार जयश्री दंडवते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यां यांनी मेहनत घेतली.
