March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.21) – जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण एक उत्तम माध्यम आहे. शिक्षणाशिवाय तणोपाय नाही. शिकून आपण विविध क्षेत्रात यशस्वी व्हाल. मात्र जीवनात यशस्वी होण्याबरोबरच चांगला माणूस होणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम येथील शिक्षकाकडून केले जाते. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण जीवनात नक्कीच चांगले माणसं होताल. असा विश्वास इप्का लॅबोरेटरीज कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख व्यंकट मैलापुरे यांनी व्यक्त केला.

रांजणगाव (पोळ) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालय बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ व इप्का कंपनीच्या सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या ब्रांचेसचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर थोरात होते. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून इप्का कंपनीचे मानस संसाधन विभागप्रमुख व्यंकट मैलापुरे, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बोडखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उद्योजक मनोज कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकासारखा चांगला दुसरा मित्र नाही, त्यामुळे नेहमी पुस्तके वाचत चला असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक यांनी केले. सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षक विलास जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी महाजन, अनिल कुमावत, के बी मोरे, रामेश्वर शेळके, डी.पी.चिमणकर, ए. एच. शेख, सी.एच.शिरसाट, तुकाराम शेलार, प्रतिमा नितनवरे, आनंद बोडके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *