वाळुज महानगर – विनापरवाना व बेकायदेशीर रित्या कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करून त्याच्या ताब्यातील एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काढतुस व दुचाकी असा 1 लाख 41 हजार रुपये किमतीचा ऐवज शनिवारी (ता.15) रोजी जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्या पथकाला माहिती मिळाली की, एक इसम लाल रंगाचा हुडी असलेल्या टि-शर्ट घातलेला असुन तो स्वतःच्या ताब्यात व कब्ज्यात अग्निशस्त्र ( पिस्टल) बाळगुन कॅनॉट परिसरात फिरत आहे. या माहितीवरून त्याचा कॅनॉट परिसरात शोध घेतला असता तो एन-5, सिडको, औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीजवळ मोपेडवर बसलेला दिसला. तो रेकॉर्डवरील नुकताच एमपीडीए भोगुन सुटलेला असल्याचे पोउपनि दगडखैर व पथकाच्या लक्षात आल्याने त्यास मोठ्या शिताफीने पकडले व त्याच्या कंबरेला लावलेले पिस्टल काढुन घेतले. त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव इम्राण मोहम्मद लतिफ, वय 24 वर्षे, रा. उमर टेलर यांचे पाठीमागे, रशिदाबाजी यांचे घरात भाडयाने, गवळीपुरा, नवाबपुरा, औरंगाबाद असे सांगितले. त्याच्या जवळील पिस्टलची पाहणी करता त्यामध्ये 5 जिवंत काडतुसे होती. या अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत व मालकी हक्का बाबत विचारता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्याकडून देशी बनावटीचे अग्निशस्त्र, 5 जिवंत काडतुसे व टिव्हिएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी असा एकुण 1 लाख 41 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचे विरुद्ध जिन्सी पोलीस ठाणे व नेकपूर जिल्हा बीड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, सफौ रमाकांत पटारे, पोना. संदीप तायडे, संजय नंद, राजेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार सुनिल बेलकर, संदीप राशिनकर, अजय दहिवाल, विजय घुगे, धनंजय सानप यांनी केली.