
वाळूज महानगर, (ता.11) – वाळूज येथील अमोल ज्ञानेश्वर धनवटे यांची शिवसेना पक्षाच्या “युवासेना छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. युवासेना महाराष्ट्र सचिव मराठवाडा विभागाचे निलेश बाबुराव शिंदे यांनी ही नियुक्ती केली.
ही नियुक्ती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची अपेक्षा या नियुक्ती द्वारे करण्यात आली असून त्याचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे.
