March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.25) – गंगापूर व वैजापूर तालुक्यातील अनेक गावातील जिल्हा परिषद विभागाच्या विविध कामात कोट्यवधीचा घोटाळा झाला, बांधकाम न करता अंदाजपत्रकाच्या 80 टक्के रक्कम ठेकेदाराला अदा केली. या दोषी असणाऱ्या बांधकाम एजन्सी ठेकेदाराचा बांधकाम परवाना काळया आदित टाकून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुखदेव काकड, कनिष्ठ अभियंता साहेबराव पाटील यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत चौकशी करून बडतर्फ करावेत. यासाठी 30 जून रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आत्मदहन आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत दिलेल्या एका निवेदनात असे नमूद आहे की, गंगापूर तालुक्यातील शंकरपूर, गुरु धानोरा, लासुरटेशन येथील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य उपकेंद्र, शाळासह विविध बांधकामात आर्थिक घोटाळा व बांधकामामध्ये अनिमिता झाली असून ठेकेदारांनी कामे पूर्ण होण्याआधीच एकूण रकमेच्या 70 ते 80 टक्के कोट्यवधी रुपयाची बिले ठेकेदारांना अदा करून ठेकेदाराच्या घश्यात करोडो रुपये काम न होता घातले आहेत. त्यामुळे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाला समोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता सुखदेव काकड यांनी जिल्हा परिषद समोर चालू असलेल्या अन्न त्याग आंदोलनाला भेट देऊन चौकशी समितीचे लेखी पत्र देण्यात आले. बांधकामाची चौकशी समिती गठीत करण्यात आली असून येणाऱ्या काही दिवसात याची पूर्ण चौकशी होऊन लेखी अहवाल देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले होते. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र आता पर्यंत कुठलीही चौकशी दोषी एजन्सीची झाली नाही. दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. याबाबत अधिक चौकशी केली असता ठेकेदारांना जी देयके अदा केलेली आहेत. त्या देयकावर कार्यकारी अभियंता सुखदेव काकड व कनिष्ठ अभियंता साहेबराव पाटील यांच्याच स्वाक्षरी असल्याची माहिती, माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे. त्यामुळे हेच अधिकारी दोषी असल्याचे कळत आहे व पुन्हा तेच अधिकारी या बोगस कामाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमत आहे. म्हणजे तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. अशी परिस्थिती सध्या जिल्हा परिषद मध्ये चालू आहे. म्हणून दोषी असणाऱ्या अभियात्यावर निलंबनाची कारवाई होऊन संबंधित बांधकाम एजन्सीला काळया यादीत टाकण्यात यावे. नसता 30 जून रोजी आत्मदहन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांनी दिला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *