March 23, 2026


वाळूजमहानगर (ता.10) :- जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन बुधवारी (ता.8) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीना म्हसलेकर तर प्रमुख पाहुणे सुनिता नेमाने या होत्या.

याप्रसंगी 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील व भारतातील प्रसिद्ध महिलांवर भाषणे केली. कुमारी ऋतुजा गवई हिने गीत गायन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी प्रगती जैन हिने सावित्रीबाई फुले, रूपाली खुणे हिने अहिल्यादेवी होळकर, संजीवनी जोगदंडे हिने कल्पना चावला, प्रतीक्षा गांगुर्डे हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई, वैशाली गायकवाड हिने राजमाता जिजाऊ, शिवानी मस्के इंदिरा गांधी, प्रिया बोरगे हिने पोलिस ऑफिसर किरण बेदी, नंदिनी साबळे हिने डॉक्टर आनंदीबाई जोशी इत्यादी आदर्श महिलांवर वेशभूषासहित भाषणे केली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत आवारे यांनी महिलादिना अतिशय मौलिक विचार व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी दुर्गादास रोडे व विजय बागूलसर यांनीही महिला दिनानिमित्त विचार व्यक्त केले. शाळेच्या वतीने शाळेतील सर्व महिला शिक्षिका, सेविका व शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला यांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. योग्यश्री डोंगरे व सुनिता नेमाने महिलांमधून प्रातिनिधिक स्वरूपात शाल, डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सविता शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मीना म्हसलेकर यांच्या अध्यक्षीय समारोपाने झाली. सविता शेवाळे यांनी आभार व्यक्त केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *