
वाळुज महानगर, (ता.27) – कार्यक्रमाला काहीतरी निमित्त लागते. विशेष म्हणजे कार्यक्रम घेण्याची आवड सुद्धा लागते. म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येथे चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून शाळेच्या प्रांगणात विविध झाडांचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात करण्यात आले. 
शाळेचा परिसर हिरवागार असावा. प्रांगणात भरपूर सावली आणि ऑक्सिजनची कमतरता नसावी. या उद्देशाने वाळूज औद्योगिक परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येथे शालेय समिती अध्यक्ष वर्षाताई अमोल बनकर यांच्या मुलगा तुषार अमोल बनकर इयत्ता 4 थी याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शनिवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी थोरात सर, साळुंके सर मुख्याध्यापक ढाले सर, नंदनवन मॅडम यांची उपस्थिती होती.
