February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे 11 डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये नॅशनल विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज रांजणगाव (पोळ) या शाळेची विद्यार्थिनी सपना अशोक धनुरे हिने जिल्हास्तरीय 17 वर्ष वयोगटात 3000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.


तसेच 10 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या गंगापुर तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 17 वर्ष वयोगटामध्ये 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात शिवानी विजय थोरात, 800 मीटर या क्रीडा प्रकारात मोनिका कारभारी तायडे व 3000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सपना अशोक धनुरे व वैभव वाल्मिक बोराडे यांनी प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला. तसेच लांब उडी या क्रीडा प्रकारात सारिका सुरेश कापसे प्रथम व पुजा भारत चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला. शाळेचे संस्था अध्यक्ष पवार, मुख्यध्यापक कन्हाळे, क्रीडा शिक्षक कुऱ्हाडे, कुकलारे यांनी सर्व विजयी खेळांडूचे स्वागत करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *