वाळूजमहानगर, ता.31 (बातमीदार) – जालना येथील कपड्याच्या एका दुकान मालकाची 12 लाख 50 हजार रुपये असलेली बॅग चार अज्ञात आरोपींनी मारहाण करून हिसकावून पळ काढला. या आरोपीस वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता.29) रोजी पकडून जालना पोलिसांच्या ताब्यात दिल्याने ते आता अटकेत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पाहिजे असलेल्या फरार, तसेच रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेत असतांना गोपणीय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की, 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास जुना मोंढा जालना येथील गुरुमुख होजिअरी कापड शॉपच्या समोरील गल्ली मधून घनश्याम अग्रवाल व सोबतचा सर्फराज फेरोज खान यांना मारहाण करून स्कुटीवर ठेवलेली 12 लाख 50 हजार रुपयाची बँग बळजबरीने हिसकावून घेवून फरार झाले. या प्रकरणी जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 309 (4), 115(2), 3(5) भा.द. वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्हयातील आरोपी रांजणगांव (शे.पु.) येथे लपून बसल्याची माहिती एमआयडीसी वाळुज पोलीसांना मिळाली. त्यावरून पोलीसांनी आरोपीतांना ताब्यात घेतले असता त्यांनी कॉलेज राजू गायकवाड (वय 21), सचिन हरिचंद जाधव (वय 22) दोन्ही रा.कैकाडी मोहला जुना जालना, ओम मारूती पवार (वय 18) रा.चमनचौक माळीपूरा जि.जालना व सुमित शैलेश धुरे असे असल्याचे सांगीतले. व जालना येथील बँग लिफ्टींगचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे आरोपिंना सदर बाजार पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, एमआयडीसी वाळूज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आमच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. विलास वैष्णव, पोलीस हवालदार बाबासाहेब काकडे, पोअं. सुरेश भिसे, राजाभाऊ कोल्हे, नितीन ईनामे, सुरेश कचे, जालिंदर रंधे यांनी केली.