March 23, 2026
IMG-20230831-WA0006

वाळूज महानगर, (ता.31) – प्राणघातक हल्ल्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या भावाचा जामीन घेण्याचे अमित दाखवून तसेच पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत दिराने बळजबरीने भावजयीवरच बलात्कार केला. नात्याला काळीम फासणारी ही घटना 14 ते 30 ऑगस्ट दरम्यान लिंबेजळगाव येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लिंबे जळगाव येथील 30 वर्षीय महिलेचा पती प्राण घातक हल्ल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे पीडित 30 वर्षीय महिला लिंबे जळगाव येथे एकत्र कुटुंबात राहत असे. 14 आगस्ट रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास आरोपी
शेख वय 28 वर्ष रा.लिंबेजळगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर याने तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या भावाच्या पत्नीला (भावजय) घराच्या आतील खोली बोलावून तुझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय कोणीही जामीन देणार नाही. असे म्हणून तसेच तिच्या नवऱ्याला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने वारंवार हे कृत्य केले. त्यानंतर बुधवारी ता.30) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहरातील भावजयीच्या दुसऱ्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडा ओरड केल्याने आरोपी शेख हा पळून गेला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात कलम 376 (2)(एन), 452, 506 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी शेख यास गुरुवारी (ता.31) रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम जी केदार करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *