वाळूजमहानगर (ता.17) :- शरद प्रतिभा ग्रामीण विकास संस्था, संतोष माने युथ फाऊंडेशन व लायन्स क्लब,औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने जामगाव, ता.गंगापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू तपासणी व शस्त्र क्रिया शिबिर नुकतेच घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच अप्पासाहेब मलकुजी माने, सरपंच बशीर पटेल, सुधीर माने यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास शुभाष माने, सुनील बोराटे, संजय तूपलोंढे, नितीन तांबे, हुसैन पटेल, राजेंद्र माने, राजेंद्र बोरुडे, भगवान ठवाल, भाऊसाहेब माने, गोकुळ ठोंबरे, प्रकाश रोडगे, धर्मेंद्र माने, श्रीकांत बोरुडे, संतोष माने, दत्ता ठोंबरे,मोहन आढाव पाटील, सर्जेराव तागड, पोपत तूपलोंधे, लड्डू भाई, प्रकाश माने व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराचे मध्ये 320 नागरिकांची तपासणी करण्यात आली. 29 रुग्णांचे 30 नोव्हेंबर रोजी मोतीबिंदूची शस्त्र क्रिया केली जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष माने यांनी सांगितले.