March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.2) – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर (मसिआ ) तर्फे आयोजित ‘अँडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो’ हे औद्योगिक प्रदर्शन जानेवारीमध्ये होणार असून या एक्सपोच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, आँरिक आणि मसिआ यांच्यामध्ये गुरुवारी (ता.1) रोजी मुंबई येथे बैठक झाली.

महाराष्ट्रातील लघु उद्योजकांना नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच छोट्या मोठ्या उद्योगांनी आँरिक मध्ये गुंतवणूक करावी. यासाठी दिनांक 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान आँरिक औद्योगिक वसाहत शेंद्रा येथे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढावी हा मुख्य उद्देश असल्याने, त्याच्या आयोजना संदर्भात गुरुवारी (ता.1) डिसेंबर 2022 रोजी मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, कनव्हेनर अभय हंचनाळ यांच्यासह शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालय येथे बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. ‘अँडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो’ या प्रदर्शनाची व्याप्ती लक्षात घेता औद्योगिक प्रदर्शनाला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन यावेळी दिल्याचे मासिआच्या शिष्टमंडळाने सांगितले. या बैठकीसाठी विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, सुरेश काकाणी, संजय दिगावकर, अजित घोरपडे यांच्यासह मसिआच्या शिष्टमंडळाची उपस्थिती होती. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाल्याचे यावेळी किरण जगताप यांनी सांगितले. या बैठकीसाठी कनव्हेन अभय हंचनाळ, सचिव राहुल मोगले, अँडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *