
वाळुज महानगर (ता.28)-पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लिंबेजळगाव येथुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिला फुस लावुन पळवुन नेले. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेवासा जि. अहमदनगर येथील संजय गायकवाड हे पत्नी व तीन मुलींसह लिंबे जळगाव येथील शेख समीर यांच्या विटभट्टीवर सुमारे तीन वर्षापासून काम करतात. त्यांची मोठी मुलगी रुपाली गायकवाड वय 15 वर्षे ही शुक्रवारी (ता.26) जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास लिंबेजळगाव येथे पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी आलीच नाही. त्यानंतर तीचा लिंबेजळगाव व नातेवाईकाकडे शोध घेतला असता ती कोठेही मिळुन आली नाही. तसेच विटभट्टीवरील लोकांनी देखील तीचा शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही. त्यामुळे खात्री झाली की, रुपाली हिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवून नेले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिचे वर्णन असे –
वय 15 वर्ष, रंग- काळा सावळा, केस काळे व लांबट, शरीर बांधा- सडपातळ, उंची 4.5 फुट, अंगात लाल रंगाचा टॉप व हिरव्या रंगाची बरमुडा पॅन्ट व गुलाबी रंगाची ओढणी, पायात लाल रंगाची चप्पल, भाषा मराठी व आयराणी भाषा बोलते.
