February 24, 2025


वाळूजमहानगर, (ता.19) – सिडको वाळूज महानगर मधील विविध नागरी वसाहतींना पाणी पुरवठ्यासाठी वर्षभरापासून सुरू असलेले जलकुंभाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे सिडको वाळूज महानगर परिसरात पाणीटंचाईचे सावट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सिडको वाळुजमहानगर प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा सुरूळीत व्हावा. म्हणून सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून मागील कित्येक वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यामुळे सिडको वाळूजमहानगर-1 मध्ये जलकुंभाचे काम मार्च 2023 मध्ये सुरूवात करण्याची परवानगी सिडको प्रशासनाकडून देण्यात आले. हे काम सप्टेंबर 2024 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या कामाची गती पहाता ते वेळेत पुर्ण होणे शक्य दिसत नाही.
तर पाणी टंचाईची समस्या-
सिडको वाळूजमहानगर मधील दिवसेंदिवस वाढती लोकसंख्येनुसार जलकुंभाचे काम लवकर होणे अत्यंत गरजेचे असुन ते झाले नाही. तर गंभीर पाणी टंचाईच्या समस्येचा सामना वाळूजमहानगर प्रकल्पांतर्गत नागरिकांना करावा लागेल.
अनाधिकृतपणे पाण्याचे नेक्शन
सिडको प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे आरसीसी
कामावर पाण्याची क्युरिंग करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने सिडको वाळूजमहानगर प्रकल्पासाठी असलेल्या पाण्याच्या जलकुंभावरून बबेकायदेशीर व अनाधिकृतपणे पाण्याचे नेक्शन घेतले. असा आरोप सिडको वाळूज महानगर येथील नागरिकांकडून होत आहे.

कामाचा दर्जा सुधारावा
सध्या सुरू असलेल्या जलकुंभाच्या कामावर क्युरिंग व्यवस्थित होत नसल्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. असा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे. याबाबत सिडको प्रशासनाने संबंधित कंत्राटदार यांना योग्य ती सूचना देऊन कामाचा दर्जा सुधारावण्या बाबत तंबी द्यावी.
अन्यथा जनअंदोलन
सिडको वाळुजमहानगर प्रकल्पांतर्गत दिवसेंदिवस पाणी पुरवठ्याच्या समस्या वाढत असताना संबंधित कंत्राटदाराकडून जलकुंभाचे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने लक्ष देऊन जलकुंभाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना द्याव्यात. अन्यथा लोकशाही पध्दतीने जनअंदोलन करण्यात येईल. असा इशारा सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, अनंत पवार, मयुर राठी, विशाल रेवतकर, अमोल विडुळकर, अविनाश काकडे, शरद शिंदे आदींनी दिला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *