February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.28) – सूर्यवंशी चौक, सिडको वाळूज महानगर -1 येथील जय हिंद कॅरियर अकडमी येथे 75 वा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन शुक्रवारी (ता.26) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय हिंद करिअर अकॅडमी चे संचालक संतोष जाधव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कमांडो निवृत्ती दहिफळे, कर्नल संजय सोनवणे, पांडुरंग चोथे, रवींद्र तेजाड यांची उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्नल संजय सोनवणे यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी मार्गदर्शन करताना निवृत्ती दहिफळे संजय सोनवणे व संजय जाधव देशसेवेचे महत्व समजावून सांगितले. नौदल, भूदल व वायू दलासह विविध क्षेत्रात नोकरी करताना पैशापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्त्व दिल्यास कसे नाव लौकिक करता येते. याबाबतचे अनेक उदाहरणे देशसेवेसाठी काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता उगले यांनी केले. तर हर्षद चव्हाण यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *