वाळूज महानगर – रांजणगाव (शे.पु.) येथील जयभद्रा विद्यामंदिर मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन शाळेतील इयत्ता दहावीत द्वितीय क्रमांक मिळविलेला विद्यार्थी योगेश देवरे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थापक सचिव आबासाहेब जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा दाभाडे, जनार्दन गाडे तर पालक प्रतिनिधी म्हणून सुरेश देवरे यांची उपस्थिती होती.
यावेळी राहुल तरोणे, प्राची पांचाळ, महेश नागे, मयुरी चव्हाण, गौरी शेळके, अक्षय फरकाडे, अनिकेत पवार, प्रीती थोर, मानसी थोरात, पृथ्वीराज ठाकूर, सर्वेश खंदारे, साक्षी डोईफोडे, तनुजा भागवत, गायत्री मगर, योगिता गायकवाड यांनी उत्कृष्ट भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा तांगडे तर आभार रविंद्र माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मनीषा सोनवणे, अर्चना जाधव, स्वाती तुपे, सुप्रिया सोन्ने, राहुल राहिंज, ज्योती गायकवाड, स्वप्निल माळी, अंकुश तुपे, मंगेश शिंदे, अर्चना आवटे, अमरदीप गायकवाड, गणेश गायकवाड, सचिन माहोर, उमेश गरुड आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.