March 23, 2026


वाळूज महानगर, (ता. 5) – माझे वडील शिक्षक सेवेनंतर शेतीचा व्यवसाय करतात. मी एका खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. यामुळे आजही शेतीची सर्व कामे करू शकतो. पोलीस प्रशासनात भरती झाल्यानंतर मी सन 2000 या वर्षापासून अधिकारी म्हणून काम पाहतो. यामुळे मला सामान्य जनतेच्या अडीअडचणी व प्रश्न हाताळण्याचा चांगला हातखंडा आहे. यातूनच अन्यायाच्या बाजूने उभे राहून, जनतेचे काही देणे असल्याने मी प्रामणिकपणे काम करत असल्याचे मत पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी बुधवारी (ता.4) रोजी बजाजनगर येथे आयोजित सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमात केले.

बजाजनगरातील दरोड्याचे प्रकरण यशस्वीपणे हातळल्याचं मनाला समाधान आहे. पत्रकार बांधव हे पत्रकारांची कामे करतात, पोलीस हे पोलिसांचे कामे करतात. त्यासाठी कुठल्याही व्यक्तीला टारगेट न करता संस्था व यंत्रणेवर कार्य करावे. माणूसही चुकतो परंतु त्यासाठी सहकार्याची भूमिका खूप महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुरमे म्हणाले. तसेच पत्रकारांनी काम करताना स्वतः सह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. त्यासाठी मेडिकल पॉलिसी काढण्याचा आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची नुकतीच जालना येथे बदली झाली आहे. यामुळे त्यांचा वाळूज महानगर पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे बोलत होते.

यावेळी वाळूज महानगर पत्रकार संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर कुरणे, माजी अध्यक्ष किशोर बोचरे, वाळूज महानगर पत्रकार संघटनेचे माजी सचिव आर के भराड, दैनिक पुण्यनगरी वाळूज महानगरचे संपादक संदीप चिखले, बबन गायकवाड, हुरखा पठाण, विठ्ठल म्हस्के, डी पी वाघ, संतोष उगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गुरमे यांचा वाळूज पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार किशोर बोचरे यांच्या मुलाने जे ई ई ऍडव्हान्स 2025 मध्ये उत्कृष्ट यश संपादन केल्याने त्याचा यावेळी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुरणे, तर आभार संतोष बारगळ यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड, राहुल मुळे, सुदाम गायकवाड, संदीप लोखंडे, नरेश देशकर, गजानन राऊत, अनिकेत घोडके, संजय निकम, शिवाजी बोडखे, अशोक साठे, संजय काळे, राजू जंगले, केशव पवार, धनराज भगत यांच्यासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अभिमन्यू सानप, राजाभाऊ कोल्हे, अविनाश ढगे, योगेश शेळके, किशोर साबळे यांच्यासह वाळूज महानगरातील पत्रकार व एमआयडीसी वाळूज पोलिसांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *