वाळूजमहानगर, ता.20 – संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे 22 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबीराच्या जनजागृतीसाठी बजाजनगर येथे शुक्रवारी (ता.20) रोजी भव्य वाहन रॅली काढण्यात आली.
संत निरंकारी मंडळाच्या वाळुज बजाजनगर विभागातर्फे रवीवारी (ता.22) डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
बजाजनगर येथील श्री जागुत हनुमान मंदीर, मोरे वौक, येथे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत होणाऱ्या या महान रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी
शुक्रवारी (ता.20) डिसेंबर रोजी भव्य वाहन रॅली काढण्यात आली. यामध्ये रक्तदानाचे महत्व दर्शविणारे फलक घेउन संत निरंकारी मंडळाच्या सेवादल स्वंयसेवकानी उत्सफुर्त भाग घेतला. “रक्त हे रस्तावर वाहन्यापेक्षा ते मानवाच्या धमन्यांमध्ये वाहिले पाहीजे” हा संदेश निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी संपुर्ण विश्वाला दिला. त्यांच्या उक्तीनुसार दरवर्षी अशा रक्तदान शिबीराचे आयोजन संपुर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात येते. अशा रक्तदान शिबीरामार्फत गेल्या 18 वर्षांपासुन मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने सातत्याने सर्वाधिक रक्त संकलन करून निष्काम सेवेचे अनुपम दर्शन घडविले आहे. याही वर्षी सर्व जागरूक रक्तदात्यांनी आवर्जुन शिबीरामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन मंडळाचे बजाजनगर शाखा प्रमुख शिवाजी कुबडे यांनी केले आहे.