March 24, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.28) – आषाढी एकादशी निमित्त वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात भाविकांच्या सेवेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रुक्माई मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून दिवसभरातून 15 लाख भाविक विठू रायाच्या चरणी नतमस्तक होण्याची शक्यता आहे.

वाळूज परिसरातील छोटे पंढरपूर हे मराठवाड्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाते. येथे आषाढी, कार्तिकी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरते. गुरुवारी (ता.29) रोजी आषाढी एकादशीला भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. या भाविकांच्या सेवेसाठी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणतात….

 

तसेच वाहतूक शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या विषयी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की,……

 

आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (ता.29) रोजी रात्री बारा वाजता पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईचा अभिषेक तर पहाटे पाच वाजता वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या हस्ते महापूजा व आरती होऊन मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दिवसभरातून जवळजवळ पंधरा लाख भाविकांची मांदियाळी पंढरपुरात दाखल होणार असल्याने त्यांच्या सेवेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *