February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.23)-कार्तिकी एकादशी निमित्त वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता.23) रोजी मोठी गर्दी केली होती. एकादशीनिमित्त छोटे पंढरपूर येथील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

प्रथम पहाटे 5 वाजेता बजाज ऑटोचे उपाध्यक्ष बाबासाहेब वालतुरे व त्यांच्या पत्नी स्वप्ना यांच्या हस्ते आरती करण्यात आली.त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी छत्रपती संंभाजीनगरसह वाळूज, बजाजनगर, रांजणगाव, जोगेश्वरी व परीरातील भक्तांनी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके, रत्नाकर शिंदे, हरिभाऊ शेळके, कृष्णा झळके, हरिष साबळे, बंकटलाल जैस्वाल यांची प्रमुख उपस्थीती होती. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे़. गुरूवारी रात्री हभप नाना महाराज कदम यांचे किर्तण झाले. तसेच शुक्रवारी सकाळी 9 ते 11 दरम्यान महंत गुरूवर्य ह भ प कैलासगिरी महाराज यांचे काल्याची किर्तन होणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *