वाळुज महानगर – टेंभापुरी, शेंदूरवादासह परिसरातील अनेक गावाला वरदान ठरलेला छत्रपती संभाजी महाराज मध्यम प्रकल्प (टेंभापुरी धरण) सलग तिसऱ्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरला. या जलसाठ्याचे पूजन हभप भास्करगिरी महाराज याच्या आशिर्वादाने व हभप कैलासगिरी महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.14) करण्यात आले.
यावेळी पौरोहित्य म्हणून दीपक जोशी गुरू यांनी मंत्रोच्चार केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, युवा नेते संतोष माने पाटील, सचिन विधाटे, माजी बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, वाळूजचे माजी उपशहर प्रमुख उत्तम बनकर, कृती समितीचे अध्यक्ष राहुल ढोले, अरुण महाराज ढोले, संरपच संतोष खवले, धनंजय ढोले, कैलास गावंडे, स्वप्निल खवले, अक्षय ढोले, कृष्णा ढोले, योगेश इगळे, विभागप्रमुख कारभारी दुबिले, ज्ञानेश्वर इंगळे, दिगंबर ढोले, दीपक खवले, विठ्ठल कुंजर, बाळासाहेब इथापे, उत्तमराव ढोले, शिवाजी शिंदे, विनोद इथापे यांच्यासह परिसरातील शेतकरी, प्रत्रकार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह सामजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाणी बचत करण्याची गरज –
पाणी हे मानवी जीवनाचा महत्वाचा घटक असून त्याचे व्यवस्थापन करून निसर्गसंवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. असे आवाहन गिरी आश्रमाचे कैलासगिरी महाराज यांनी याप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मानवाने स्वर्थासाठी निसर्गचक्राचा होत असलेला ऱ्हास थांबवणे गरजेचे आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ जनतेवर येत असून पाण्याचा योग्य वापर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिवसेंदिवस पाण्याचे महत्व वाढणार असून पाणी व्यवस्थापन करून जास्तीत जास्त बचत कशी करता येईल. याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
परिसरातील 42 गावांना लाभ-
वाळूज परिसरातील टेंभापुरी धरण हे नागझरीसह लवकी नदीवर आहे. सर्वात कमी पायाच्या वर असलेल्या धरणाची उंची 16.42 मीटर (53.9 फूट) आहे तर लांबी 5,300 मीटर (17,400 फूट) आहे. खंड सामग्री 809 किमी 3 (194 क्युसेस मीटर) आहे. आणि एकूण साठवण क्षमता 21,260.00 किमी 3 (5,100.55 क्युसेसमीटर) घनमीटर आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात एकूण 42 गावांसह वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने परिसरातील 42 गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पातून 22 गावांना राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.