
वाळुज महानगर, (ता.16) – वडगाव कोल्हाटी गट नंबर येथील छत्रपती संभाजीराजे इंग्लिश प्राइमरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रामा मुळे, अँड जोगेंद्रसिंह चौहान तसेच अशोक भोसले व मदन गोरे, रवी आवारे, निलेश कदम तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष औताडे, उपाध्यक्ष वैभव औताडे, कु. आरती औताडे, शाळेचे मुख्याध्यापक माणिक राठोड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँड जोगेंद्रसिंह चौहान यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती विषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष औताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपापल्या भाषणातून थोर क्रांती कारकांचे विचार मांडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक चेतन सर, भुरे सर, दत्ता सर, मोहिनी मॅम, पूजा मॅम, मयुरी मॅम, मीरा मॅम, आशा मॅम, जयश्री मॅम, स्वाती मॅम, सुवर्णा मॅम तसेच ऋतिक महाजन, मुंदडा काका आदींनी परिश्रम घेतले.
