
वाळूजमहानगर, (ता.6) – जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणार्या तसेच जिल्ह्याच्या नामकरणावरून सुरू केलेल्या या आंदोलनात औरंगजेब याचा फोटो वापरल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेत वाळूज येथील कामगार चौकात खा. इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळून सोमवारी (ता.6) रोजी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर असे नामकरण व्हावे. अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. नुकतेच राज्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिल्याने छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाले. मात्र एमआयएम पक्षाच्या जातीयवादी खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरू केले. तसेच उपोषणामध्ये ओरंगजेबचा फोटो वापरून छत्रपती संभाजीनगरचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यामुळे इम्तियाज जलील यांचा विरोध म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेकडून जलील यांचा पुतळा जाळुन निषेध केला. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरावत पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील, जालिंदर पाटील एरंडे, जिल्हाउपाध्यक्ष सुखदेव सोनवणे, नितिन कळातरे, सौरभ घोलप, शिवा सालुंके, मयूर पाटील, अविनाश पाटील, गौरव ठाकुर, गौरव महाले, आकाश घोटुले, नागेश चव्हाण, दिनेश ठाकुर, सागर करहाडे, सौरभ पवार, किरण खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
