February 22, 2025

वाळूज महानगर, (ता.11) – बजाजनगर येथील स्व.भैरोमल तनवानी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासह रक्तदान शिबीर, नेत्रदान शिबीर, विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान, विविध मान्यवर मार्गदर्शन, शिक्षकांना सायकल वाटप तसेच आमदार किशनचंद तनवानी यांच्या सोबत आज ज्यांचा वाढदिवस आहे. अशा बालकांसोबत केक कापून अभीष्टचिंतन सोहळा. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे यांच्या व्याख्याणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना संयम ठेवावा, नेहमी सकारात्मक विचार करावा, वेळ नक्की बदलते. फक्त हार मानू नका, लक्षात ठेवा परिवर्तन फक्त मेहनतीनेच होते. असे सांगितले.

तर पालकांनाही सांगितले की, जर तुम्ही आपल्या आईवडिलांचा सन्मान केला तरच तुमचे अपत्ये तुमचा सन्मान करेल. तसेच शेतीवरून वाद करू नका, नाते जपा असे आवाहान केले. यावेळी तनवानी यांच्या सोबत आज ज्यांचा वाढ दिवस आहे अशा बालकांसोबत केक कापण्यात आला.

त्यानंतर आमदार किशनचंद तनवानी यांच्या हस्ते शाळेच्या कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

त्यानंतर सरपंच सुनील काळे यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन तर विठ्ठल कांगणे यांच्या हस्ते रक्तदन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आमदार किशनचंद तनवानी यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांना सायकल वाटप करण्यात आल्या.

त्यानंतर पर्यावरण जनजागृतीसाठी शिक्षकांनी सायकल रॅली काढली. व पर्यावरण बचाव चा संदेश दिला. यानंतर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, गीत गायन, कविता वाचन चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी हनुमान भोंडवे यांनी किशनचंद तनवानी यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा आलेख आपल्या प्रास्ताविकात केला. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मोफत पाणी वाटप,

घाटी परिसरात खिचडी वाटप, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत. यासारख्या अनेक कार्य किशनचंद तनवानी करत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातून गुणवंत विद्यार्थी घडावे. यासाठीच बजाजनगर मध्ये त्यांनी 1998 मध्ये स्व. भैरोमल तनवानी शाळेची आपणा केली असल्याचे यावेळी हनुमान भोंडवे यांनी सांगितले.

कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी तथा उद्योजक हनुमान भोंडवे, अशोक लगड, राजेंद्र माने, पंडित नवले, विजय उखळे, प्राचार्या अर्चना जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, राजश्री कदम, अशोक मुटकुले, सरपंच सुनील काळे, आय जी. जाधव, अरविंद धिवर, दशरथ मुळे, बाळासाहेब कारले, राजू दहातोंडे,

प्राध्यापक सुनील पाडाळकर, श्रीकृष्ण भोळे, बप्पा दळवी, लक्ष्मणराव लांडेपाटील, प्रकाश निकम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *