वाळूजमहानगर, (ता.21) – औरंगाबाद येथील एका चोवीस वर्षीय तरूणाने वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपूंजी) येथील सावतानगरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.19) रोजी सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सागर बाबुराव कोंगळे (24), रा. हनुमाननगर मुकंदवाडी रेल्वे पटरीजवळ आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याने रविवारी सांयकाळी 7.30 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपूंजी) येथील कमळापूर रोडवरील सावतानगर येथे एका तृतीय पंथीयाच्या घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सागर याला बेशुध्द अवस्थेत घाटीत दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र सागर याच्या आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
