March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.26)- दाखल असलेला दुर्वा इलेक्ट्रीकल्स कंपनीमधील अल्युमिनियम चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकिस आणुन गुन्हयातील चोरीस गेलाला मुद्देमाल 100 टक्के जप्त करून तीन आरोपीतांना अटक करण्यात आली. वाळूज पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही विशेष कामगीरी केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रमोद लक्ष्मण खोमणे रा. जिकठाण ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर
यांची दुर्वा इलेक्ट्रीकल्स नावाची कंपनी आहे. येथुन रिपेअरिंगचे मटेरीअल व स्क्रॅप मटेरीअर असा 44 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी प्रमोद खोमणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात 25 जानेवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 380,461 427,34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास करताना वाळूज पोलीस ठाण्यातील विशेष पथकाचे पोउपनि शंकर शिरसाठ व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय माहीती वरुन गुन्ह्यातील संशयीत सय्यद नजीर सय्यद वाजेद रा. किराडापुर बदामगल्ली छ.संभाजीनगर, शरीफ मुसा सय्यद रा. पवननगर राजंणगाव (शेणपुंजी) व शेख अजीम शेख नईम रा. किराडापुर बदामगल्ली छ.संभाजीनगर यांना ताब्यात घेवुन पोलीसी खाक्या दाखवतात त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले व गुन्ह्यातील चोरी केलेले संपुर्ण रिपेअरिंगचे मटेरीअल, स्क्रॅप मटेरीअर असा मुद्देमाल काढुन दिला. चोरीच्या मुद्देमालासह ही चोरी करण्यासाठी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली.

ही  विशेष कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप-आयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, विशेष पथकाचे पोउपनि शंकर शिरसाठ, पोह. विनोद परदेशी, पोना सतिष हंबर्डे, पोअ. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, सुखदेव कोल्हे, श्रीकांत सपकाळ, सुधीर कांबळे यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *