February 5, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.12) – अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेली लोखंडी पेटी सोमवारी (ता.12) रोजी सकाळी सिडको वाळूज महानगर परिसरात सापडली. मात्र आतील सात तोळे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज गायब आहे.

तिसगाव परिसरातील म्हाडा कॉलनी येथे देवा वीरा महेर (वय 36) हे कुटुंबासह वस्तीवर राहतात. मंगळवारी कुटुंबासह सर्वजण जेवण करून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून रोख रकमेसह दागिने ठेवलेली लोखंडी बुधवारी (ता.7) रोजी पेटी चोरून नेली होती. झोपडीवजा घरामध्ये ठेवलेल्या या लोखंडी पेटीमध्ये 3.50 तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 3.50 तोळ्यांची सोन्याची चैन, 4.25 ग्राम चांदीचे कडे, नुकतीच विकलेल्या जुन्या गाडीचे रोख 2 लाख 50 हजार रुपये, विकलेल्या दोन म्हशीचे 1 लाख रुपये, दुध विक्रीचे 1 लाख रुपये व घरात ठेवलेले 25 हजार रुपये. असा एकूण 4 लाख 75 हजार रुपये ठेवलेले होते. असे देवा माहेर यांनी सांगितले. दरम्यान भागुबाई महेर व त्यांची दोन मुले हे घरात झोपेत असतांना अचानक पेटीची कडी वाजल्याचा आवाज आला. उठल्यानंतर त्यांना चोरटे पेटी घेऊन जातांना दिसले. भागुबाई यांनी आरडाओरड केली. त्यामुळे पतीसह वस्तीवरील इतर नातेवाई जागी होऊन त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून औरंगाबाद पुणे रोडने पसार झाले होते.
दरम्यान चोरी गेलेली ही लोखंडी पेटी तब्बल पाच दिवसांनी म्हणजेच सोमवारी (ता.12) रोजी सकाळी सिडको वाळूज महानगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सापडली. मात्र या पेटीतील रोख रकमेस सोन्या चांदीचे दागिने मिळून पावणे पाच लाख रुपयांचा ऐवज गायब आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *