February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.17 – दुचाकी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील एका आरोपीस वाळूज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून 40 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली ही कारवाई (ता.15) रोजी करण्यात आली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख सलीम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास वैष्णव, पोलीस हवालदार बाबासाहेब काकडे, रविंद्र गायकवाड असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहीजे असलेल्या आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करत असताना रांजणगाव फाटा येथे एक इसम संशयीतरित्या वावरत असतांना दिसला. त्याच्याजवळ पोलीस पोहचले असता, तो त्यांना पाहुन तेथुन पळुन गेला. पाठलाग करत पकडून त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अरबाज खान आजम खान (वय 29 वर्ष) रा. पवननगर रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले. त्याने 11 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास कामगार चौक येथून दुचाकी (एम एच 20, डी आय 2881) चोरल्याची कबुली दिली. त्यास अटक करून त्याच्या ताब्यातील 40 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त, नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त. महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *