वाळूजमहानगर, (ता.8) – चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी आलेल्या चोरट्याला मंगळवारी (ता.7) रोजी एमआयडीसी वाळूज पोलीसांनी पंढरपुर येथून अटक केली. त्याच्या ताब्यातून 90 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोउपनि. प्रविण पाथरकर यांना पंढरपुर येथून वळदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी विक्रीसाठी एक जण आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपळा
रचून रचला. थोड्यावेळाने एक जण विना क्रमांक दुचाकी घेऊन आला. त्याला ताब्यात घेत विचारपुस केली. जलाल हमीद शेख ( 24) रा.खेडगांव ता. अंबड जि. जालना असे त्याने त्याचे नाव सांगितले.
दिड महिन्यापुर्वी व सहा महिन्यापुर्वी जोगेश्वरी येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. 90 हजार रुपये किमतीच्या या दोन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.