चोरीच्या दुचाकीसह आरोपी जेरबंद,
वाळूज पोलिसांची तत्पर कारवाई

वाळूज पोलिसांची तत्पर कारवाई
वाळूज महानगर – वाळुज येथील बाजार गल्लीतील दूध डेअरी समोरून रविवारी रात्री चोरीस गेलेल्या साठ हजार रुपये किमतीच्या दुचाकीसह आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला 24 तासाच्या आत जेरबंद केले. वाळूज पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांचे चांगलेच धावे दणाणले आहे.
जिकठाण येथील जगन्नाथ बबनराव सोळुंके (31) यांनी त्यांची एच एफ डिलक्स दुचाकी (एम एच 20,एफ एन -5026) ही वाळूज येथील बाजार गल्लीतील शरद दूध डेअरी समोर रविवारी (ता.21) उभी करून 10.22 वाजेच्या सुमारास समोरच्या टपरीवर गेला तेथून पाचच मिनिटात परत येईपर्यंत दुचाकी लंपास केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलवाले करीत असताना वाळुज पोलिसांनी तपासाची चक्रे तेज करत दुचाकी चोर उद्धव जनार्दन पानकर रा. तुर्काबाद यास पोलिसांचा खात्या दाखवून त्याच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी जप्त केली. ही कारवाई पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त उज्वला वनकर, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज पोलीस ठाण्याचे विशेष पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस आमदार श्रीकांत सपकाळ, नितीन धुमाळ, आनंद वाहूळ, गणेश लक्कस, किशोर साबळे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. आर. दिलवाले करीत आहे.