
वाळुज महानगर, (ता.10) – चिंचडगांव (ता.वैजापूर) गांवातील कुणबी नोंद सापडलेली असुन कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे, कुणबी प्रमाणपत्रचे फायदे काय, वंशवळी कशी काढायची. याबाबत मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांनी सोमवारी (ता.9) रोजी सविस्तर मार्गदर्शन केले.
मराठा हदय सम्राट मनोज दादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण कुणबी शोध मोहीम संपूर्ण महाराष्ट्र भर चालु आहे. तसेच 29 आँगष्ट 2025 ला मुंबईला जाण्याचे नियोजन आहे. याच पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील चिंचवडगाव येथे कुणबी नोंदी सापडल्या. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे?, काय करावे लागेल? याबाबत मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांनी सविस्तर मार्गदर्शन करून मराठा समाज बांधवांना 29 ऑगस्ट रोजी मुंबईला येण्याचे आव्हान केले.
यावेळी त्यांच्यासोबत मराठा सेवक ज्ञानेश्वर पाटील इंगळे, शरद बाजीराव बोरणारे, आनंदराव शेलार, सुनील कडू कारभार, नवनाथ कारभारी शेलार, लक्ष्मण दादासाहेब काळे, राहुल हुकूमराव तांबे, किरण राजाराम तांबे, संदीप काशिनाथ शेलार, अर्जुन दादा शेलार, नारायण शांताराम गवळी, विनोद नानासाहेब तांबे, सचिन ज्ञानेश्वर कर्डक, रामदास काकासाहेब शेलार, विनोद नानासाहेब तांबे, आप्पासाहेब नामदेव पवार, गणेश कारभारी जाधव, सोन्याबापु कारभारी शेलार, अतुल नानासाहेब निकोले, सिंधुबाई आसाराम बारहाते, कमलाबाई हरिभाऊ बिलबिसे, सोन्याबाई गोपीनाथ जाधव, राधाबाई लक्ष्मण शेलार, ज्ञानाबाई कारभारी शेलार, बाळासाहेब गावडे, केशव गोविंद तांबे. आदिसह समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
