February 23, 2025


वाळूजमहानगर, (ता.28) – कार व दुचाकीवरुन आआलेल्या 6 ददरोडेखोरांनी पाठलाग करत ट्रक समोर कार आडवी लावुन चालक व क्लिनरला बेदम मारहाण करुन खताची वाहतुक करणारा ट्रक लंपास केला. ही घटना मंगळवारी (ता.28) रोजी भल्या पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील ए एस क्लबजवळ घडली. यावेळी दरोडेखोरांनी ट्रकमधील 3 लाखाचे खत, रोख 20 हजार रुपये व 13 लाखाचा ट्रक असा 16 लाख वीस हजाराचा ऐवज लंपास केला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आळंद ता. फुलंब्री येथील योगेश अशोक काकडे (28) व क्लीनर लक्ष्मण खमाट हे ट्रक (एम एच 41, एयु-3809) ट्रकमध्ये 400 बॅग खत भरुन तसेच ट्रकचे 20 हजार रुपये भाडे आगाऊ घेऊन सिल्लोडला पोहोच करण्यासाठी सोमवार (ता.27) सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास
निघाले होते. मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास
वाळूज परिसरातील ए एस क्लबजवळ आले असता कार (एम एच 02, सीएल -2276)च्या चालकाने ट्रकसमोर कार आडवी लावली. अचानक ट्रकसमोर कार आल्याने चालक योगेश काकडे याने ट्रक उभा करताच कारमधील तीन अनोळखी इसम कारमधुन खाली उतरले. यानंतर काही वेळातच काळ्या रंगाच्या दुचाकी (एम एच 28, बी ई -6048) वर ट्रिपल सीट आलेल्या कारचालकांच्या साथीदारांनी ट्रकचालक योगेश काकडे व क्लिनर लक्ष्मण खमाट यांना शिवीगाळ करुन ट्रकच्या खाली ओढले. त्यानंतर चालकाच्या खिशातील 20 हजार रुपये हिस्कावुन घेतले. तसेच ट्रकचालक व क्लिनर यांना हात-पाय तोडण्याची धमकी देत लाकडी दांड्याने बेदम मारहाण करीत ट्रकच्या काचा दगडाने फोडल्या. रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी कुणीही न आल्याने जीव वाचविण्यासाठी चालक योगेश काकडे व क्लिनर लक्ष्मण खमाट हे दोघे दरोडेखोरांच्या तावडीतुन सुटुन वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. त्यानंतर दरोडेखोरांनी 2 लाख 73 हजाराच्या 400 खताच्या बॅग व 13 लाखाचा ट्रक असा एकुण 15 लाख 92 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *