
वाळूजमहानगर, (ता.4) – वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2019 मधील भादंवी कलम 306, 504, 34 मधील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून 4 वर्षा पासून फरार होता.
धम्मपाल नारायण सावते, वय 33 वर्ष, रा. खडसने, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड. असे या आरोपीचे नाव आहे. याचा वाळूज एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंदे, कॉन्स्टेबल राहुल बंगाळे, गणेश सागरे यांनी शोध घेतला असता तो मिळून आला. याआरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
